अंबेजोगाई (दत्ता खोगरे) :-
महाराष्ट्रातील ग्रंथालयांची गेल्या चार वर्षापासून राज्य शासनाकडे शासनमान्य ग्रंथालय संघाच्यावतीने विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला परंतु राज्य शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 19 सप्टेंबर रोजी विविध मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया बीड समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयातीला कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करण्यात यावी, शासनामान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांना कामाचे तास शासकीय कामकाजानुसार पुर्ण वेळ किंवा अर्धवेळ करण्यात यावे, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाची नैसर्गिक वाढ होण्यासाठी सन 2012 पासुन बंद करण्यात आलेली वर्गवाढ व नवीन शासनमान्यता देण्यात यावी, अधिनियमान्वये तरतुद करण्यात आलेल्या राज्य ग्रंथालय परिषदेची आणि जिल्हा ग्रंथालय समित्यांची पुनर्रचना करण्यात यावी यासह इतर मागण्या करण्यात येणार आहेत.
या आंदोलनात ग्रंथालयातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ नरहरी मंठेकर, कार्यवाह ग्रंथमिञ अनंतराव चाटे, डाँ राजेंद्र सावर, पवन गिरवलकर, डाँ राजकुमार थोरले, ग्रंथमिञ कांतीलाल बेडसुरे, प्रा.डी.जी.धाकडे, ग्रंथमिञ विश्वनाथ शिंदे, विश्वांभर गणाचार्य व सार्वजनिक ग्रंथालय कृतिसमितीचे बीडचे अध्यक्ष वसुदेव गायकवाड, कर्मचारी संघ, व बीड व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.