नळदुर्ग (सचिन गायकवाड) :-

तुळजापूर तालुका स्तरीय 2018-19 चा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.प्रा.शा.हंगरगा(नळ)च्या प्राथमिक शिक्षिका श्रीम.राऊत एस.एन.यांना मा.मंत्री मधुकराव चव्हाण यांच्या पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सभापती शिवाजीराव गायकवाड, जि.प.सदस्या अस्मिता कांबळे, गटविकास अधिकारी ढवळशंख, गटशिक्षणाधिकारी धुरगुडे, पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले, सर्व जि प सदस्य व पंचायत समिती सदस्य, पंचायत  समितीचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीम. राऊत यांनी हंगरगा शाळेत वृक्षारोपण व वृसंवर्धन,ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती व त्याचा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर,ई-लर्निग,डीझिटल क्लासरुम,मुख्याध्यापक व शिक्षक सहकाऱ्याच्या मदतीने शाळा रंगरंगोटी,100%वर्ग प्रगत असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत.

राऊत मॅडम यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डी डी कदम,जिल्हा व्हा.चेअरमन मनोज चौधरी,शिक्षक नेते धनाजी मुळे, जिल्हा उपाध्यक्ष इटकरी सर,केंद्र प्रमुख अरुण अंगुले, तालुका सोसायटीचे चेअरमन प्रशांत मिटकर,व्हा चेअरमन डी पी शिंदे,संचालक धनंजय पंडीत,दयानंद जवळगावकर, विठ्ठल गायकवाड, संचालिका कुरुम मॅडम,शिवाजी सुरवसे, सिध्देश्वर कुंभार, सी बी स्वामी, आप्पा कुलकर्णी,औसेकर सर प्रकाश माळी,शाम राठोड,डी यु राठोड,बालाजी माळी आदींनी शुभेच्छा दिल्या...
 
Top