उस्मानाबाद : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते मंगळवारी दि़. ११ सप्टेंबर रोजी करण्यात आले़. जिल्ह्यातील विविध शाळेतील अडीचशेपेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे़.
उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर क्रीडा कार्यालय, तायक्वाँदो, फुटबॉल व शिकाई मार्शल आर्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार रणदिवे यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी व श्री हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन व तायक्वाँदो खेळाडूंमध्ये लढत लावून करण्यात आले़.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेच्या २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे़ फूटबॉल, तायक्वाँदो व शिकाई आर्शल आर्ट्ससह विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत़ यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयाचे श्री़ शेख, तायक्वाँदो असोसिएशनचे सचिव राजेश महाजन, सहसचिव अनिल बळवंत, उपाध्यक्ष राज जाधव, फूटबॉल संघटनेचे सचिव जावेद शेख, रविंद्र जाधव, एकनाथ सुतार, राम दराडे, वैभव मेंढेकर, स्मिता गायकवाड, आकाश मोरे आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते़