तुळजापुर : कुमार नाईकवाडी

भारीप बहुजन महासंघाच्या वतीने बहुजन आघाडीचे शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार्क मैदान सोलापुर येथे पहिल्या होणाऱ्या अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर भारीप बहुजन संघाच्या वतीने दि.२८ शुक्रवार रोजी  प्रथम  डाँ बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पन अभिवादन करून भारीप बहुजन महासंघाच्या वतीने तुळजापुर ते सोलापूर भव्य दिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.

या बहुजन आघाडीच्या महाआघाडी च्या अधिवेशनास पाठींबा देण्यासाठी मोटार सायकल रँलीत परीट धोबी संघटना ढोर समाज संघटना कैकाडी समाज संघाटना हिंदु नाथ पंथी डवरी गोसावी  समाज संघटना आदीसह ६५ संघटना नी  अधिवेशनास पाठींबा दर्शविला होता.या मोटार सायकल रँलीत भारीप बहुजन समाजाचे जिल्हाध्यक्ष मिलींद रोकडे परीट समाज बांधवाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे  शशीकांत गायकवाड रवि कोरे विकास बनसोडे शंकर कोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थिती होते.
 
Top