तुळजापूर :
येथील तुळजाभवानी महाविद्यालयात मराठी विभागातर्फे शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन अभिनय कलाः तंत्र व अविष्कार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यशाळेचे ऊदघाटक श्रीकांत नाडापुडे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की,तुळजाभवानी महाविद्यालयाचा अभिनय क्षेञात सुवर्ण इतिहास आहे. उमेश जगताप, शंतनु गंगणे, दिपाली साखरे, दिलीप भोसले यांसारखे दिग्गज कलाकार या महाविद्यालयाने महाराष्ट्राला दिले. यथार्थ अभिनय म्हणजे आपल्या भूमिकेशी अचूक तर्कशुद्ध वृत्ति ठेवणे होय.आपल्या कलेच्या अधिष्ठाणाचे अध्ययन हे खरया अभिनयाचा श्रीगणेशा आहे. या वेळी कलेतील ललित अंगाचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख म्हणाले की, अभिनयात बाह्यांग व अंतरंग अभ्यासण्याची गरज आहे.अभिनयाशी तादात्म्य स्थापित साधणे ऊत्तम कलाकाराचे लक्षण आहे.कलाकाराला प्रत्येक क्षण आपल्या अंतःकरणात साठऊन ठेऊन तो जगता आला पाहीजे असा मौलिक विचार त्यांनी या वेळी मांडला .अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की,माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाशी असलेला जिव्हाळा जपला पाहिजे ,प्रत्येक विद्यार्थ्यां मध्ये कला सुप्तावस्थेत असते यासाठी विशिष्ट मंचावर येण्याचे धाडस विद्यार्थ्यांच्या मध्ये असावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी शिवाजी बोधले यांनी अंधळ्या खिडक्या नावाच्या एकांकी मधील एक प्रसंग सुंदर पध्दतीने करुन दाखविला.तर सचिन घोडके यांनी अभिनयातील संवाद विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.सोहम कांबळे यांनी ऊत्तम मिमिक्रीचे सादरणीकरण केले.बी.कॉमभाग तसेचा बी.ए.भाग १च्या विद्यार्थी कलावंतानी आपली कविता सादर केली.कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.रावसाहेब देशमुख यांनी तरआभार प्रा.रविंद्र शेटे यांनी मानले.
