तुळजापूर :

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयतुळजापूर येथे मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बापूजी साळुंखे वाड्;मय मंडळाचे मोठ्या ऊत्साहात उदघाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, व्यंकटेश महाजन महाविद्यालय उस्मानाबाद तथा संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद उपकेंद्र परीसर उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या म्हणाल्या की, साहित्यातुन आपल्या भावनांचा निचरा होत असतो.साहित्यिक निःस्वार्थपणे समाजाची सेवा करत असतात.कोणत्याही भाषेचे साहित्य हे भावनिक समतोल साधत असते.वेदनेचा हुंकार साहित्यातुन प्रकट होत असतो.स्वर्गीय लेखिका कविता महाजन यांच्याही साहित्याचा त्यांनी आढावा घेतला.स्ञीवादी साहित्य म्हणजे भावनांचा महापुर असतो.शब्दांचा वापर जपून करण्याचा अनमोल संदेश त्यांनी शेवटी दिला.  

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की, सत्यम, शिवम, सुंदरम हे वाक्य साहित्यविश्वाचे महाब्रिद आहे. प्रत्येक भाषेच्या साहित्यात या महाब्रिदाची प्रचिती आपणास येते. सत्यमेव जयते या उक्तिवरच आपले साहित्य आधारित आहे,साहित्य वास्तवामध्ये मानवी जिवनाची संजीवनी आहे असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मेजर वाय.ए.डोके यांनी केले तर आभार प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

 
Top