लोहारा : इकबाल मुल्ला
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे सह्याद्रि फाऊंडेशन्स व चाईल्ड लाईन उस्मानाबाद,सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,उस्मानाबाद व शिवतेज गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19 सप्टेंबर रोजी सर्वरोग निदान शिबीर व कान तपासणी व मोफत श्रवणयंत्र वाटप,1098 टोलफ्रि नंबरची जनजागृती,गुणवंत विद्यार्थी सोहळा व शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके-देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पो.नि.सर्जेराव भंडारे,सरपंच राम मोरे,माजी सरपंच सुर्वणाताई विजय लोमटे,पोलीस पाटील संजय नरसाळे,चेअरमन संतोष गवळी, बाजीराव जाधव,मधुकर जाधव,गजानन पाटील, पत्रकार इकबाल मुल्ला,मजहर पठाण,अभिजीत माने अदि उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम पो.नि.सर्जेराव भंडारे व डॉ.दिग्गज दापके देशमुख यांच्या हस्ते गणपतीची आरती करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांनी आरोग्याविषयी सविस्तर माहीती सांगुन शासनाच्या आरोग्यविषयी विविध योजनेची माहीती सांगुन 1098 टोल फ्री नंबरची सविस्तर माहीती सांगुन जनजागृती केली.
यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी,गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवुन सन्मानित करण्यात आले. चाईल्ड लाईन 1098 टोलफ्रि जनजागृती अभियानात हिप्परगा रवा येथील स्वामी रामानंद तिर्थ विद्यालय व जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्वरोग निदान शिबीरात एकुण 340 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.व यामध्ये 25 जणांची कानाची तपासणी करण्यात आली.या तपासणी केलेल्या 25रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात येणार आहे.या रुग्णांची तपासणी राजेश श्रीगीरे,डॉ.सतिश गवाड,ज्ञानेश्वर ढवन,यांनी केली.
या शिवतेज गणेश मित्रमंडळाच्या युवकांनी पुढाकार घेवुन डी.जे.ला फाटा देवुन सामाजिक उपक्रम राबविल्याने परिसरातुन या गणेश मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन पाटील व सुत्रसंचालन हरीदास मुळे यांनी केले तर आभार एम.के.जाधव यांनी मानले.या कार्यक्रमास अनिल जाधव,रामहरी मुळे,बाळु लोहार,दत्ता मुळे,अण्णा लोहार,सुर्वणा मुळे,विमल जाधव,मिना मुळे,प्रियंका मुळे,नागेश लोमटे,पत्रकार अशोक दुबे,पोलीस पाटील तानाजी माटे,गोपीनाथ मैंदाड,बसय्या स्वामी,सौदागर शेख,सुधीर घोडके,अजित जाधव,सौदागर पांचाळ यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
