तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या एन.सी.सी.विभागास ५३ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.कमांडींग ऑफीसर कर्नल एम.पी.सिंग यांनी महाविद्यालयाच्या एन.सी.सी सारख्या  ऐतिहासिक विभागास नुकतिच भेट दिली.तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाची एक वेगळी ओळख आहे.कर्नल सिंग यांची ही भेट देखील एक ऐतिहासिकच भेट आहे.  

कर्नल सिंग यांनी गत तिन वर्षापूर्वीच्या एन.सी.सी.विभागाच्या कार्याबद्दल मेजर डॉ .वाय.ए.डोके यांच्याकडुन माहिती घेतली.छाञसैनीकांनी सिंग यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सलामी दिली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांनी त्यांचे अभिवादन करुण स्वागत केले.सिंग यांनी छाञसैनिकांना सैन्य भरतीसाठी इंतभूत माहिती पॉवर पॉइंटच्या सहायाने देऊन देशसेवा करण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नए असे सांगितले ,एन.सी.सी.विभागाच्या कार्याबद्दल सिंग यांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी कर्नल ए.के वर्मा,सुभेदार मेजर भालेराव,हवालदार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top