अक्कलकोट : रियाज सय्यद

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने भाविकांसाठी केलेल्या सर्वसोयी प्रेक्षणीय उद्यान, शिवस्मारक, गडकिल्ले आदीमुळे अक्कलकोटच्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे पर्यटन रोजगारात निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे प्रतिपादन माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. मोहिते-पाटील यांचा सत्कार मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते समर्थांची प्रतिमा, कृपावस्त्र, पुष्पहार घालुन करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पुशसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, रविंद्र भंडारे, अप्पा हंचाटे, संपादक प्रविण देशमुख, बाळु पोळ, महांतेश स्वामी, एस.के.स्वामी, राहुल इंडे आदी उपस्थित होते

 
Top