अक्कलकोट : रियाज सय्यद

अक्कलकोट येथील कलाकार अंजली लोंढे भुमिका करत असलेली संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित झांगडगुत्ता सिनेमा २१ संप्टेबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत असुन या चित्रपटाकडुन खुप अपेक्षा आहेत असे या चित्रपटातील कलाकार अंजली लोंढे यांनी सांगितले. या चित्रपटातील कलाकार सोमवारी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पुर्वसंध्येला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आल्या होत्या.त्याप्रसंगी ते बोलत होत्या.

बोरीउमरगे सारख्या ग्रामीण भागातुन येऊन चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या अंजली लोंढे यांचा झांगडगुत्ता या चित्रपटात संजय खापरे यांची पत्नीची भुमिका असुन मराठी विनोदविरांचा झांगडगुत्ता २१ संप्टेबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


झांगडगुत्ता हे नांवच मुळी परिचयाच नसल्याने गेल्या काही दिवसांपासुन या चित्रपटाबददल उत्सुकता वाढली होती.सिनेमाचे पोर्स्टर्स नुकतेच रिलीज झाले असुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.झांगडगुत्ता सिनेमात मराठीमधील नावाजलेले असंख्य विनोदवीर एकत्रित आले आहेत.जयंत सावरकर,भारत गणेशपुरे,सागर कारंडे,किशोर चौगुले,संजय खापरे,किशोरी शहाणे,माधवी जुवेकर,विजय कदम,जयवंत वाडकर,सिध्देश झाडबुके,सुधीर निकम,अंशुमाला पाटील, नागेश भोसले इत्यादी विनोदवीरांची फौज या सिनेमात बघायला मिळणार आहे.सिनेमाचे संगीतकार बबली हक असुन गीतकार सचिन अंधारे आहेत.झांगडगुत्ता हा विदर्भीय शब्द आहे.त्याचा अर्थ सावळागोंधळ आहे.विदर्भातील दरसवाडी गावातली ही गोष्ट.या गावामध्ये प्रत्येकाला गावचा विकास करायचा आहे पण त्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.आजकालच्या श्रेय घेण्याच्या आणि पुतळे स्मारंक बांधण्याच्या कुरघोडीवर त्यांच्या मानसिकतेवर विनोदाच्या अंगाने किलेली मिश्कील टिपणी म्हणजे झांगडगुत्ता.जिथे तिथे प्रत्येक जण आपले अस्तित्व ,स्वार्थ टिकविण्यासाठी मेलेल्या माणसाचा पण विचार करत नाही अशा मानसिकतेवर हा सिनेमा बोट ठेवतो.माणुस मेला तर त्याच्या मागे त्याचा मित्रपरिवार फक्त आणि फक्त स्वत:चा विचार करतात.जग किती प्रॅक्टिकल आहे हे माणुस गेल्यावर कळते.मेलेल्या माणसाच्या दु:खात शोकाकुल झालेल्या खोटय माणसाचा वास्तववादी विदभीर्य विनोदी चित्रपट म्हणजे झांगडगुत्ता.नुकतेच या सर्व कलाकारांना नागपुर येथे बोलावुन सत्कार करून समान्मचिन्ह देण्यात आले.चित्रपट बघुन अक्कलकोटच्या या कलाकारांचा अभिनय कसा वाटला हे सांगुन आर्शिवाद दयावेत असे आवाहन कलाकार अंजली लोंढे यांनी केले.
 
Top