सांगली : राजेश पाटील
यंदा मान्सून ने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावली. पिकांचीउगवण चांगली झाली .तद्नंतर पावसाने उघडीप दिली.परिणामीपिकांची वाढ खुंटली आहे.खुरटी पिके असल्याने हायब्रीड ,मका,व इतर कडधान्ये यांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.सध्या ही पिके पोटऱ्यात आहेत पण पाऊसच नसल्याने त्यांची वाढ पूर्णतः खुंटली आहे. भुईमूग ,तूर,उडीद,मूग यासारख्या कडधान्यांतील शेंगात बीजधारणा होऊ शकलेली नाही. पिकांवर रोगांचा प्रदर्भाव पाने कुरतडणार्या आळीचा दिसून येत आहे.एन दाणे भरण्याच्या काळात पावसाने तबबल महिनाभर ओढ दिल्याने कडधान्ये सह हायब्रीड उत्पादन घटणार आहे.
यंदा वळीवाने तर पूर्णतः चकवा दिला आहे.तर मान्सून चा पत्ताच नाही.अधून मधुन कधीतरी पडणाऱ्या पावसाने पिकांना जीवदान मिळत असले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.अनियमित व पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून त्यातूुन फार काही बळीराजाच्या हाताला लागेल अशी परीस्थिती नाही.ना चाऱ्यासाठी ही पिके वापरता येणे अशक्य आहे,शिवाय पिकात गर्भ धारणा होण्याच्या कालावधीतच पावसाची ओढ बसल्याने यंदा खरिपाच्या उत्पन्नात घट होणार आहे.द्राक्ष बागायतदार द्राक्ष बागेची काडी तयार करण्यात यशस्वी ठरला असला तरी पुढील महिन्यात पीक छाटणी घ्यावी लागणार आहे.पाण्याची अवस्था बिकट आहे.साठवून ठेवलेले वाटर टॅंक तळ गाठत आहे.भूजल पातळी खालावली असल्याने पाणीसाठयात ही वाढ झालेली नाही.पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून ची आशा धूसर झाली आहे.बळीराजाला आता प्रतीक्षा आहे ती परतीच्या पावसाची.
दरवर्षी नानाविध अडचणींचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाठ सोडाव्यास तयार नाही.यंदा मान्सूनचे नियोजित वेळेत आगमन झाले,जमिनीतील समाधानकारक ओलीवर पेरन्या झाल्या.पिकांची उगवण ही चांगली झाली पण पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली.तासगांव पूर्व भागात प्रामुख्याने द्राक्ष बागेनन्तर कोरडवाहू जमिनीत हायब्रीड ज्वारी ,मका,व कड धान्ये व पशुपालन केले जाते.गेली चार पाच वर्षे वरुराजाची अवकृपा झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा यक्ष प्रश्न भेडसावत आहे.साठवण करून ठेवलेली वैरण सम्पत आली आहे.सकस चारा जनावरांना उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांची फॅट कमी लागून दर ही कमी मिळत आहे.पशुखाद्याचे वाढते दर व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालताना बळीराजाची पुरती दमछाक होत आहे.
सध्या परिसरात पाऊस पूर्णतः थांबला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन पडत आहे.सकाळी दव पडत आहे. या बदलत्या हवामानामुळे रोगाचा प्रादूरभाव वाढत आहे. भइुमुग तूर,सोयाबीन, मटकी,मूग उडिद या कडधान्यात दाणे भरण्याचा हाच काळ आहे.पण याच कालावधीत पाऊस नाही पिकांना पाण्याची नितांत गरज आहे ,हायब्रीड ,ज्वारी ,मका या पिकांची देखील हीच अवस्था आहे. कष्टाची एकवेळची भाजी -भाकरी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला पुढच्या वर्षी देखील कसरत करावी लागणार आहे.
वन्यप्राण्यांना ही चारा पाण्याची वाणवा
सध्या परिसरात माकड, ससा, मोर यासारख्या वन्य प्राण्यांना ही खाद्यााची कमतरता जाणवत आहे.पोटातील पोटाचा वणवा शमविण्यासाठी माकडाचे कळप भुईमुगाच्या मोठया प्रमाणावर नासधूस करत आहेत.त्या वेलीला शेंगांच नसल्याने पाला खाऊन भूक शमवित असल्याचे विदारक चित्र आहे पाण्यासाठी व खाद्यासाठी वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत बिनधास्त वावर वाढला आहे.
