सांगली : राजेश पाटील

बनावट ओळखपत्र प्रकरणात पोलिसांनी काँग्रेसचा तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील याच्यासह चौघांना अटक केली आहे. पृथ्वी ई-सेवा केंद्र आणि राहुल आर्ट या दुकानांतून दोन संगणक, दोन प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील चौघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिली.

महादेव सदाशिव पाटील (वय 49, रा. तासगाव), शैलेश सदाशिव कागले (वय 45, रा. शंभरफुटी रस्ता, सांगली), रामराज वसंत बावडेकर (वय 51, रा. कोल्हापूर), गणेश विठ्ठल कदम (वय 26, रा. गोटेवाडी, ता. तासगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

 
Top