सांगली : राजेश पाटील
विटा (सांगली) येथील कै. जगन्नाथ तात्या कदम कला,क्रीडा व्यायाम मंडळाच्या कदम वाड्याचा राजा या गणेशोत्सव मंडळतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि 19 रोजी 'लागीर झालं जी'या मालिकेतील जयडी उर्फ अभिनेत्री किरण ढाणे ही विट्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जयडी च्या हस्ते या गणपतीची आरती झाल्यानंतर तिने प्रेेक्षकांशी मनमुराद गप्पा मारून विटेकरांची मने जिंकली.
विटा पोलीस स्टेशन पाठीमागे असणाऱ्या कदमवाड्याचा राजा येथे बसवण्यात आलेल्या गणपतीची महाआरती ही 'जयडीच्या' हस्ते झाली.आरतीनंतर जयडी प्रेक्षकांसोबत मनमुराद गप्पाही मारल्या.लागीर झालं जी या मालिकेतील डायलॉग म्हणून जमलेल्या तरुणाईला जयडी ने घायाळ केले.
'लागीर झालं जी'या मालिकेने अबाल वृद्धांच्या काळजाचा वेध घेतला आहे.यात फौजीची भुमिका साकारणारा आज्या-शितली, जयडी-भैय्यासाहेब व राहुल्या ,मामी ही पात्रे सर्वांच्याच मनात घर आहेत. झी चैनल वर ही मालिका गेली बरीच दिवस चालली असून ही मालिका जवानांमध्ये सुद्धा लोकप्रिय झालेली आहे. यातील मुख्य धाडसी,व कावेबाज व खुन्नसी भूमिका साकारणारी 'जयडी'(किरण ढाणे)ही सर्वांच्याच लक्षात राहिली आहे.
