आरळीच्या निसर्ग सानिध्यात रमली शालेय आठवणींची मैफिल
तुळजापुर - तालुक्यातील आरळी बु हे गाव तस परिसरात खूपच चर्चेत असत कारण या गावात 1967 साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची एकमेव शाळा त्या शाळेने अनेक रत्न घडवली आहेत,जी आज देशभर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.अशाच एका 1987 च्या एस.एस.सी.चे वर्गमित्रांनी गेट टू गेदर माध्यमातून एकत्र दैनंदिन जीवनातून वेळ काढत निसर्गाच्या सानिध्यात सुख दुःखाच्या गोष्टी जाणून घेत मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी सुनिल कृ.पारवे,मोहन द.पौळ,अरुण द.नन्नावरे,गणेश सां.व्हरकट,सुनिल ल. धोतरकर,भास्कर ना.बोबडे,सुभाष द. गायकवाड ,माधव म. बामणकर,डिंगबर ह. उंबरकर,संजय पारवे,कुमार दा. मातोळे,लक्ष्मण ग.जाधव,रमेश वि. यादव,दत्ता रा. पाटिल,सुधाकर अं. पारवे,अनिल सु. सलगर,बालाजी द. माने,संजय लि. जाधव,हामीद क.पठाण,बाळासाहेब प्र.पाटिल आदींची उपस्थिती होती.
वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत असताना पुन्हा 32 वर्षांनंतर एकत्र येणं तस अवघडच असत,पण नियोजन करत गेट टू गेदर घडवून आणत गाव परिसरातील तलावाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेत गप्पांची मैफिल खूपच मजेत सम्पन्न झाली.