अणदुर, दि. 04 :

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण सर्वजण सुपरिचित आहातच. अभाविप ही एक विद्यार्थी संघटना असून ती गेल्या कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच समाजातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असते. त्यापैकी आम्ही आज दिनांक 04 नोव्हेंबर, 2019 रोजी गावातील काही प्रमुख समस्या निवेदनात्मक ग्रामपंचायत, अणदूरला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  खंडोबा मंदिर परिसर, हुतात्मा स्मारक, जुनी चावडी, वत्सला नगर, धनगर गल्ली, आदी. अशा बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण विखुरलेल्या स्वरूपात आढळून येत आहे. त्या कचऱ्यावर असलेले अन्य-पदार्थ, प्लास्टिक पिशव्या तसेच इतर पदार्थ हे गाई-म्हशी सह सर्व जनावरांचे खाद्य बनले आहे. त्यामुळे जनावरांसह गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येसह बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी कचऱ्याचे तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी अणदूर ग्रामपंचायतला जाग आणण्याचे काम अभाविप करत आहे. यासह अणदूर ग्रामपंचायतला कुलदैवत खंडोबा मंदिरामध्ये स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी धोबी कट्टे, गाळमुक्त गटारी, इत्यादी आवश्यक सर्व ठिकाणातील परिसर तात्काळ स्वच्छ करण्याचे आवाहन अभाविप करीत आहे. वरील निवेदनातील ग्रामस्तरावरील कामे पुढील पंधरा दिवसात करावी हि नम्र विनंती केलेली आहे. हे प्रश्न 15 दिवसात मार्गी नाही लागल्यास अभाविप अणदुर शाखेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविप अणदूर शाखेने दिले आहे. तरी ग्रामपंचायत कार्यालय अणदूरने या समस्यांचा तात्काळ निपटारा करावा अशी मागणी शहरमंत्री निखिल पवार यांनी केली आहे
     
 अणदूर शहरातील समस्त ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती अभाविप करीत आहे.  कोणीही रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही कचरा टाकू नये, आपण कचरा रस्त्यावर टाकल्यास तो सर्वत्र विखुरला जातो व घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतीलच परंतु त्याअगोदर सर्व नागरिकांनी स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन अभाविपने केले आहे. यावेळी कार्यालय मंत्री प्रशांत सुरवसे, महादेव निर्मळे, रवि निर्मळे व जिल्हा कार्यालय मंत्री अंकुश चिनकरे आदी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top