तुळजापूर : उमाजी गायकवाड
लोहारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई सुर्यवंशी पाटील, यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत,महाराष्ट्र मराठा सोयरिकने त्यांच्या खांद्यावर उस्मानाबाद जिल्हा महिला सोयरीक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
जयश्रीताई सुर्यवंशी पाटील ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी समाज शास्त्रात M, A B,ed केलेले आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षितिजावर त्या सतत अग्रेसर राहत आलेल्या आहेत, आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी जनमानसात आपले आगळे वेगळे असे स्थान निर्माण केलेले आहे, सामाजिक क्षेत्राबरोबरच त्या राजकीय क्षेत्रात सुद्धा अग्रेसर असून त्या महिला बचत गट सक्षमीकरना करिता सतत अग्रेसर राहून फार मोठी क्रांती त्यांनी त्या क्षेत्रात घडून आणलेली आहे.अनेक सामूहिक विवाह सोहळे सुद्धा त्यांच्या प्रेरणेतून राज्यात घडून आले आहेत.
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील विनाशुल्क वधु वर
परिचय मेळाव्याला त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पाल्य व पालकांसह हजेरी लावलेली आहे, व यथोचित मार्गदर्शन वधु वर पालकांना केलेले आहे, त्यांच्या याच कार्याची दखल घेत नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील जवंजाळ पाटील बुलडाणा यांनी त्यांचा सत्कार करून त्यांची उस्मानाबाद जिल्हा महिला सोयरीक संघाच्या अध्यक्ष पदाची घोषणा केली.
यावेळी पोपटराव पाटील सपकाळ, सौ प्रतिभाताई जगताप, नितीनजी बागल, संभाजीराव फरताडे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्योतिरामजी गोरे, प्रा. नागनाथ बागल, लातूर जिल्हा समनवयक माधवराव गंभिरे, सौ रंदवणी यादव, सौ अनुजाताई पाचरणे पाटील, शेखर पाटील काळे, सुधीर काळवाघे, सौ वैशाली म्हस्के ,श्री घायाळ पाटील, अॅड.शिंगणे, कैलासराव बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
