काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जागतिक आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा किकबाॅक्सिंग पट्टु जयदेव घनश्याम म्हमाणे यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
या स्पधाॅ दिं. 12 ते 18 नोंव्हबर 2019 या कालावधीत इटलीची राजधानी रोम येथे होणाऱ्या UWW जागतिक पॅानक्रेशन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. रोम येथे होणाऱ्या या स्पधेसाठी आॅल इंडिया ट्रेंडिश्नल रेसलिंग संघटनेचे अध्यक्ष उमर मुक्तार तांबोळी यांनी निवडीचे पत्र देण्यात आले असे जयदेव म्हमाणे यांनी सांगितले .
भारतीय संघात सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अंकुर जैन मध्य प्रदेश (57 किलो), महेश झुंडरे महाराष्ट्र ( 60 किलो), जयदेव म्हमाणे महाराष्ट्र ( 90 किलो), मोनिल सॅम्युअल महाराष्ट्र ( 67 किलो), आयन सिन्हा कलकत्ता ( 84 किलो), पाॅल डिकिसन केरळ ( 71 किलो) यांचा समावेश आहे. हा संघ 11 नोव्हेंबर रोजी इटलीची राजधानी रोमकडे रवाना होणार आहे किकबाॅक्सिंग पट्टु जयदेव म्हमाणे यांनी विविध देशात जाऊन आजपर्यंत , सुवर्णपदक, रोप्यपदकाची तसेच ब्राॅन्झ कमाई केली आहे. 1995 मध्ये वडगाव (काटी) सारख्या ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड (पुणे) येथे जावून विविध कंपन्यात काम करीत कराटे, किकबाॅक्सिंग या खेळात यश संपादन केले. रोम येथे होणाऱ्या स्पर्धेत निवड झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्य़ाची मान उंचावली असून वडगाव ( काटी) सह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
