अणदूर, दि. 05 :
तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल सांगली येथील भारतीय माहिती अधिकार संघटनेचा समाजरत्न हा पुरस्कार यावर्षीचा उत्कृष्ट पर्यावरण सेवा पुरस्कार 2019 म्हणून मा.डॉ.नथानिएल ससे संचालक वान्लेस हाँस्पिटल मिरज,मा.डॉ. दयानंद नाईक जेष्ठ नाट्य दिग्दर्शक, मा.अँड.शशिकांत चौधरी मुंबई उच्च न्यायालय मुंबई कायदेशीर सल्लागार संघटक प्रमुख मा.रविंद्र कांबळे जेष्ठ पत्रकार सांगली,मा.शौकत नायकवडी अध्यक्ष भारतीय माहीती अधिकार संघटना यांच्या हस्ते हाँटेल सिझन फोर येथे दि.3 रोजी च्या आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्या बद्दल चंद्रकांत हागलगुंडे श्रीकांत अणदुरकर, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. अमरदीप कंदले,महाराष्ट्र एन.जी.ओ.फेडरेशन अध्यक्ष दिपक आगळे,मेघराज किलजे, चंद्रकांत गुड्ड, दयानंद कांळुके, संजीव आलुरे,सचिन तोग्गी,सुदर्शन मोकाशे,सचिन गायकवाड, लक्ष्मण दुपारगुडे,गुणवंत मुळे,गंगाधर कबाडे,दयानंद नरे,गौरीशंकर धुमाळ आदींनी अभिनंदन केले.
