काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव, तामलवाडी, देवकुरूळी, पिंपळा(खुर्द), पिंपळा (बु), येथे शनिवार दि. (18) रोजी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट उस्मानाबाद आणि जिल्हा परीषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावातील कोरोना सहाय्यता कक्षात गरीब, गरजू व निराधार व्यक्तींना 100 जिवनावश्यक वस्तूंचे किट, मास्क आणि सॅनिटायझरचे सोशल डिस्टंन्सचे काटेकोर अंमलबजावणी करीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,जिल्हा परीषद सदस्या श्रीमती सुषमा शहाजी लोंढे,पचांयत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत (अण्णा) लोंढे, पिंटू मुळे सरपंच भामाबाई देवकर, तामलवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर माळी, सुरतगावचे उपसरपंच विठ्ठल गुंड, पोलीस पाटील प्रविण कुंभार, तलाठी आबासाहेब सुरवसे, ग्रामसेवक बी.ए. दराडे, कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख तुकाराम क्षीरसागर, आबासाहेब मगर,सुरतगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया सुर्यवंशी,ग्रा.पं. अण्णासाहेब गुंड, मच्छिंद्र गुंड, पत्रकार प्रभाकर जाधव यांच्यासह विजय देवकर,नवनाथ सुरते, महेश नकाते,आबा गुंड, पांडूरंग गुंड,राम गुंड, गजेंद्र बोचरे, निरंजन करंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.