अक्कलकोट, दि. 19 : कोरोना विषाणू मुळे संपूर्ण देश लाँक डाऊन आहे.महाराष्ट्रात सुध्दा संचार बंदी असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत.काल रात्री चन्नई हून कलबुर्गी मार्गाने मुंबई कडे जाण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल पावडर चे माल वाहतूक गाडी अक्कलकोट तालुक्यातील वागदरी हून सोलापूर मुंबई कडे जात असतातच माल वाहतूक चालक व सहकार्याला कलबुर्गी पासून वागदरी पर्यत बंद असल्यामुळे कुठेच जेवण व नाष्टा मिळाले नाही.अनेक ठिकाणी चौकशी करुन हि काहीच जेवण्याची व्यवस्था होत नव्हते.पोटात अन्नाचा कण नाही म्हणून चिंता मध्ये ट्रक चालक विचार करत सावकाश गाडी चालवत होते.
महिन्यापूर्वी याच रस्त्यावर ट्रक ड्रायव्हर जाताना वागदरीत सिद्धगंगा हाँटेल जेवण करुन पुढे गेले होते.निदान तिथेच पुन्हा काहीतरी जेवण मिळेल म्हणून काल रात्री पुन्हा सिद्धगंगा हाँटेल मध्ये आले तिथे बंद असल्यामुळे पाहून निराश झाले पण हाँटेलचे मालक प्रकाशा पोमाजी हाँटेल बंद करुन संचार बंदीमुळे गावात न राहता हाँटेल मध्ये परिवारा सोबत राहत आहेत.त्याना ट्रक ड्रायव्हर दिवसभर जेवण केले नाही म्हटल्यावर अत्यावश्यक सेवा बजावंत आहेत.आपण याना जेवण द्यावे म्हणून आपल्या घरतील बनविलेले भाजी भाकरी दोघांनी देले त्याना जेवण्यासठी आग्रह केला.
सकाळी पासून उपाशी असलेले ट्रक ड्रायव्हर पोटभर जेवण मिळल्यावर अतिशय आंनद झाले.प्रकाश पोमाजी यानी सामाजिक बांधिलकी जपत जेवण दिल्या बदल हिंदी भाषिक ट्रक ड्रायव्हर मनापासून आभार व्यक्त केले.अशा वेळी मदत करण्याची गरज आहे.आपण माणूसकी जपत बंद असतानाही घरातील जेवण देऊन आमची भूक भागवली म्हणून धन्यवाद व्यक्त केले.जेवण करुन पुढे मेडिकल साठी लागणाऱ्या पावडर घेऊन मुंबई कडे रवाना झाले.
हा़ँटेल मालकाचे माणूसकीचे दर्शन घडवून वेगळा आदर्श ठेवला आहे.
संकलन
धोंडपा नंदे,वागदरी