वागदरी : धोंडपा नंदे  

कोरोना विषाणू मुळे जनजीवन ठप्प आहे. अक्कलकोट च्या तहसिलदार अंजली मरोड यांच्या आवाहन नुसार ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक आपण समाजाचे कायतरी देणे लागतो यानुसार शेतकरी स्वच्छेने ज्वारी, गहू, तांदूळ दान दिले अदांजे आतापर्यंत 20 क्विंटल धान्य जमा असून अजून हि नागरिक मदत देत आहेत.



अक्कलकोट तालुक्यातील   शिरवळवाडी ग्रामसेविका शैलजा पोमाजी यानी सर्व धान्ये जमा करुन अक्कलकोट तहसिलदार कार्यालयात जमा करणार आहेत.त्या नंतर गरजूना अन्न धान्य वापट करण्यात येणार आहे  तसेच याकामासाठी ग्रामसेविका, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका, कोतवाल मिळून काम करत आहेत.अशी माहिती ग्रामसेविका शैलजा पोमाजी मँडम यानी सांगितले.
 
Top