काटी : उमाजी गायकवाड

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तहानभूक विसरून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाचा आदर करीत आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  काटी येथील रहिवासी तथा सध्या दुबईत असणारे रामहरी उर्फ बाळासाहेब मारुती लोंढे यांनी दुबईतून त्यांच्या कुटुंबियां आणि मित्रांद्वारे 2 एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांची मिठाई, पाणी बॉटल,किट देऊन नाष्ट्याची सोय केली होती. त्यावेळी काटी येथील नाझ फाऊंडेशनला गरजूंना मदत करण्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवार दि. (19) रोजी येथील कोरोना सहाय्यता कक्षा समोर सरपंच आदेश कोळी, सुमित लोंढे यांच्या हस्ते नाझ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिस मुजावर यांचेकडे रोख स्वरूपात पाच हजार रुपये सुपूर्द करण्यात आले.
         
यावेळी सरपंच आदेश कोळी, डॉ. अनिस मुजावर, पत्रकार उमाजी गायकवाड, करीम बेग, काकासाहेब रोडे उपस्थित होते.
 
Top