नळदुर्ग : वागदरी ता.तुळजापूर  येथे लाँकडाऊनच्या काळतील तिसऱ्या टप्प्यातील रोगजंतू नाशक फवारणी पूर्ण करण्यात आली आहे.
   
 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक  उपाययोजना   लाँकडाऊन व संचार बंदीच्या काळातील गावच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील औषध फवारणी आज दि.१९ एप्रिल  रोजी पूर्ण करण्यात आली. 

 यावेळी गावातील रस्ते ,गटारी व गल्ली बोळात सर्वत्र जंतू नाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी सरपंच, ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच, दत्ता सुरवसे, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार ,कोरोना सहाय्यता समीतीचे सदस्य तथा ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, सहशिक्षिका एम.आर.चौधरी पत्रकार एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ ,ग्रा.प.कर्मचारी सर्जेराव चव्हाण ,ओंकार चव्हाण आदी उपस्थित राहून ही फवारणी पुर्ण करून घेतली.
 
Top