उस्मानाबाद : संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा- लॉकडाउनचा आदेश आहे. असे असतांनाही दि. 02.04.2020 रोजी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा धोका होईल असे कृत्य करुन फिरत असणारे 1)मुस्तफा लायक तांबोळी 2)अकबर मोहियोद्दीन शेख 3)सुरेश शेषेराव कामटे 4)गणेश हरी गुजरे 5)प्रविण सारंग जाधव 6)उल्लाउद्दीन रसुल बागवान 7)शेख सोहेद उल्ताफ सर्व रा. उस्मानाबाद 8)दिपक सेपान खंडागळे रा.जुनोनी, ता.उस्मानाबाद 9)सागर शाहु बेंद्रे 10)अलिश्वर रावण सुरवसे दोघे रा.येडशी, ता.उस्मानाबाद 11)संदीप नेताजी जाधव रा.चिलवडी, ता.उस्मानाबाद 12)धनाजी दत्तु सुरवसे रा.खेड, ता.उस्मानाबाद 13)वसिम हैदरअली मोगले रा.मुरुम, ता.उमरगा 14)अजित सतीश तेलंग 15)ज्ञानेश्वर वाल्मीक बोयणे 16) मंथन राम पोतदार 17)वाजीद मशाक कार्ले चौघे रा.उमरगा 18)नवनाथ रामराव गायकवाड रा.गुंजोटी 19)अभिजीत नाथ जाधव रा.तुरोरी 20)सुधाकर ढवरु राठोड रा.उमरगा, 21)अभिषेक सुरेश गोरे रा.उस्मानाबाद याने आदेश झुगारून त्याच्या ताब्यातील ‘तेरणा हेअर सलून’ दुकान उघडे ठेवले, 22)लक्ष्मीकांत रटकळ 23)इब्राहीम बाबु नदाफ 24)बसवराज बिराजदार 25)प्रदिप गायकवाड चौघे रा. मुरुम, ता.उमरगा यांनी सिमेंट दुकान उघडे ठेउन सिमेंट विक्री करुन वाहुन नेले 26)चेतन डमरे 27)अमोल चौधरी दोघे रा.बार्शी यांनी नाका तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरले. अशा एकुण 27 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये स्वतंत्र 18 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top