तामलवाडी, दि. ०३ :
संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर असतांनाही संचार बंदीचे उल्लंघन करुन फिरणाऱ्या- दुकान उघडे ठेवणाऱ्या 1)लक्ष्मण शिवाजी सगर 2)सचिन बाळासाहेब पाटील 3)गुरुनाथ सोमनाप्पा कोंडे तीघे रा.तामलवाडी, 4)संतोष नागनाथ गायकवाड रा.धोत्रा 5)नाना वसंत मोरे उर्फ पांडुरंग रा.गंजेवाडी, ता.तुळजापूर या पाच व्यक्तींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम- 188 च्या 5 स्वतंत्र गुन्ह्यांत दोषी ठरवून प्रत्येकी 1,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
