उस्मानाबाद, दि. ०८ : लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 07.04.2020 रोजी अशी एकुण 214 वाहने ताब्यात घेतली आहेत.

तर आज दि. 08.04.2020 रोजी  एकुण 78 वाहने (वृत्त लिहीपर्यत) ताब्यात घेतली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे.
 
Top