उस्मानाबाद, दि. १४ : लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 13.04.2020 रोजी उस्मानाबाद (श.)- 41, उस्मानाबाद (ग्रा.)- 18, तुळजापूर- 58, नळदुर्ग- 8, शिराढोण- 15, कळंब- 61, शहर वाहतुक शाखा- 72, अशी एकुण 273 वाहने ताब्यात घेतली आहेत.