नळदुर्ग : सुहास येडगे
मदत करणारा कोणीही असो तो नेहमी आपल्यासाठी देवदूतच असतो. प्रत्येकाची अशीच अपेक्षा असते की आपण अडचणीत असताना कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावे. यातूनच एक एस के जागीरदार डेव्हलपर्स यांच्या कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी शहरांमध्ये जेवण्याचे डबे वाटप करण्यात आले. गरीब लोकांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती एस,के जागीरदार यांनी त्यांच्या माध्यमातून किराणा मालाचा साहित्य व एक किट शहरांमध्ये एक हजार गरजू गरीब लोकांना तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते शहरांमध्ये अनेक ठिकाणी वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात त्यांचे काम धंदे पूर्णपणे बंद झाले आहेत. कामधंदे बंद असल्यामुळे या गोरगरीब कुटुंबातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.परीणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते जागीरदार यांनी तात्काळ नळदुर्ग परिसरातील लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहे . वाटप करते वेळेस उपस्थित तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, एस .के जागीरदार, मंडळाधिकारी, तलाठी, नगरसेवक बसवराज धरणे, भाजपचे सुशांत भूमकर, मुन्ना जागीरदार, पप्पू पाटील, सुजित सुरवसे प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.