उस्मानाबाद,  दि. १४ :- उस्मानाबाद तालक्यातील बेंबळी ग्रामपंचायत कडून 12 हजार 500 मास्क तर 3000 सॅनिटाझर वाटपासाठी आशाकार्यकर्ती कडे सरपंच सत्तार शेख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. 

बेंबळी ता. उस्मानाबाद गावातील प्रत्येक कुटूंबाची माहीती घेऊन आराखडा तयार केला व सर्व आशा कार्यकर्तीनी आप आपल्या कार्यक्षेञातील घरोघरी जाऊन मास्क वाटप करून त्या कुटूंबाची स्वाक्षरी घेऊन याबाबतची माहीती ग्रामपंचायत कार्यालयास कळवणार आहे.तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून आशा कार्यकर्तींना प्रत्येक घरी आरोग्याबाबत काळजी घ्या स्वच्छ हात साबणाने धुवा याबाबत जनजागृतीचा संदेश द्या असे आवाहन सरपंच सत्तार शेख यांच्या वतीने कळविण्यात आले अशी माहीती देण्यात आली.


सर्व आशा कार्यकर्तीना मास्क सॅनिटायझर वाटपासाठी सरपंच सत्तार शेख व ग्रामविकास अधिकारी श्री करपे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. 

बेंबळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंध म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने गावातील प्रत्येक कुटूंबास मास्क सॅनिटायझर वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच  सत्तार शेख यांनी यावेळी सांगितले.
 
Top