जळकोट,दि.१४ (मेघराज किलजे):

 एकीकडे देशात कोरोना विषाणूमुळे अनेकांचे संसार बंद पडले आहेत. अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे. अशात उत्तर प्रदेशचे एक कुटुंब जळकोट(ता. तुळजापूर) येथे उदरनिर्वाहासाठी भाड्याने आहे. या कुटुंबाची कोरोना संचार बंदीमुळे उपासमार होत असताना, या कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी  वाचनालय ही संस्था व एका बँकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  दिवशी उत्तर प्रदेशच्या कुटुंबाला मदत करून त्यांची चूल पेटवली आहे.

सध्या संपूर्ण देशात कोरोनाव्हायरस मुळे संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीत ज्या- त्या राज्यात बाहेरील राज्यातील लोक अडकून पडले आहेत. अशा लोकांची व कुटुंबांचे व्यवसाय बंद पडल्यामुळे त्यांच्या संसाराच्या चूली बंद आहेत. असेच एक उत्तर प्रदेश राज्याच्या झांसी जिल्ह्यातील करणपुरा या गावचे एक कुटुंब जळकोट(ता. तुळजापूर) येथे एक वर्षापासून छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी आले आहे. जितेंद्रकुमार असे कुटुंब कर्त्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी अर्चना कुमार व अन्य नितीन कुमार, रामू कुमार व आयुष कुमार असे पाच जणांचे कुटुंब आहे. हे कुटुंब हातगाड्यावर पाणीपुरी व भेळ विकून आपला संसार भागवतात.

पण कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू झाल्यापासून त्यांचा हात गाड्यावरील व्यवसाय बंद पडला. व या कुटुंबाची उपास मार  व्हायला सुरुवात झाली. संचार बंदीनंतर काही दिवस हाल-अपेष्टा ने उदरनिर्वाह केला. परंतु परराज्यातील असल्यामुळे त्यांची गावात ओळख नाही. त्यामुळे  त्यांची ऐन संचारबंदी काळात पंचायत झाली. उत्तर प्रदेश ला जायचे म्हटले तर..! पूर्णतः वाहतूक बंद आहे. अशा कठीण प्रसंगी जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय ही संस्था व जळकोट येथील गेल्या पाच वर्षापासून उमरगा जनता सहकारी बँकेत कॅशियर या पदावर कार्यरत असलेले सोमनाथ महाजन यांनी एकत्र येऊन, या कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य व किराणा साहित्य देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी देऊन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री-पुरुष एकच जात व मानवता हा एकच धर्म..! हा विचार प्रत्यक्षात कृतीत आणून त्या कुटुंबाची चूल पेटवली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजासमोर ठेवले आहेत.

जळकोट येथील जळकोटवाडी नळ रस्त्यालगत असलेल्या या कुटुंबाला प्रत्यक्ष घरी जाऊन यांना अन्नधान्य  व किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, जळकोट येथील उमरगा जनता सहकारी बँकेचे कॅशियर सोमनाथ महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट येथील कार्यकर्ते मल्लिकार्जुन कुंभार, मधुकर कारले, राम पवार, सिद्धू डांबरे, शिवराज्य राचेट्टी, पार्वती कन्या प्रशाला चे सहशिक्षक बसवराज मडोळे, अमोल कदम, बालाजी कुंभार, अपु मेंगशेट्टी, मस्तान बागवान, मोहन डांबरे, इमरान बागवान, बिस्मिल्ला बागवान, जितेंद्रकुमार व त्याचे कुटुंब उपस्थित होते.
 
Top