अक्कलकोट, दि. १५ :

वागदरी ता. अक्कलकोट येथील सुपूञ आदर्श  शिक्षक गुणवंत नारायण चव्हाण सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सर फाउंडेशन महाराष्ट्र च्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी गुणवंत चव्हाण याची निवड करण्यात आले आहे.

स्टेट इनोव्हेशन अँड रिर्चस फाउंडेशन महाराष्ट्र (सर फाउंडेशन,महाराष्ट्र ) देशातील शिक्षकांचे महत्त्वाची नेटवर्क आहे. अशा सर फाउंडेशन महाराष्ट्र च्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी गुणवंत चव्हाण याची निवड करण्यात आले आहे.असे निवडीचे पञ सर फाउंडेशन चे राज्य समन्वक बाळासाहेब वाघ व सिद्धाराम माशाळे यांनी दिले आहे.  या निवडीमुळे चव्हाण यांचे सर्वत्र क्षेत्राततून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

 
Top