उस्मानाबाद, दि. 10 :
दि. 22.03.2020 पासुन लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरणाऱ्या व्यक्तींना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार आज पर्यंत 870 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 3,101 वाहनांवर कारवाया करुन एकुण 7,03,200/-रु. तडजोड शुल्क वसुल करण्यात आले आहे
