उस्मानाबाद, दि. १० : पो.ठा. परंडा गु.र.क्र. 58/2016 भा.दं.वि. कलम- 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी- शामराव काशिनाथ काळे व रंजना शामराव काळे दोघे रा. वडनेर, ता. परंडा यांना स्था. गु. शा. चे पो. नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. खोडेवाड, पोहेकॉ- काझी, खोत, पोना- शेळके, सर्जे, पोकॉ- सावंत, महिला पोना- होळकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 09.04.2020 रोजी ताब्यात घेउन पो.ठा. परंडा यांच्या ताब्यात दिले आहे.
