पुणे : धोंडपा नंदे

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू मुळे भयंकर हाहकार माजवला आहे.संचारबंदी असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिस यशस्वीपणे पेलत आहेत.बंदोबस्ताबरोबर पोलिसांची खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकी दिसून आली आहे.पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संतोष राठोड,निलकंठ राठोड बंधूनी समाज समोर वेगळा आदर्श ठेवला आहे. संचार बंदीमुळे काम नसल्यामुळे कामगार मंजूरावर खाण्या पिण्याचे संकट उभे राहिले असून हडपसर काळेपडवळ परिसरातील मंजूरांची अवस्था पाहून राठोड बंधूनी या मंजूराना मदत करण्यासाठी पुढे आले.
      
सर्व कामगार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असून नागणसूर,तोळणूर,लिबीचिंचोळी येथील पन्नास कामगारांना मदत करण्यासाठी निलकंठ राठोड आणि संतोष राठोड पोलीस कॉन्सटेबल दोघानी मिळुन लॉकडाऊन मुळे अडकलेल्या काळेपडळ येथील मजुरांना शंभर किलो गहु,शंभर किलो तांदुळ,शंभर किलो रवा व शंभर किलो साखर आणि पन्नास किलो तुरडाळ असे जीवनावश्यक वस्तू 50 मंजुराना स्वखर्चाने वाटप करुन देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी घरातच राहण्याचा आवाहन केले आहे.
     
राठोड बंधू हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे असून पोलिस खात्यात कार्यरत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावात तोळणूर मध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असून गावातील समाज मंदिराच्या बांधकाम स्वतः खर्च करून बांधून दिले आहे.तसेच दरवर्षी आपल्या गावातील शाळेतील मुलांना शालेय वस्तू वाटप करत असतात.महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांचे वाढदिवस अनाथ व वृद्धा आश्रमात जाऊन साजरा करतात व मदत करतात.
       
पोलिस खात्यात असलेले राठोड बंधूचा आपण समाजाचे देणे लागतो,या भावनेतून उचलेल्या पावलाचे कौतुक होत आहे.असे कर्तव्यदक्ष,समाज बांधिलकी जपणारे पोलिस असतील तर पोलिसांबदल समाजा दुष्टीकोनही चांगलाच होईल.
 
Top