अणदूर, दि. ०१ :

कोरोना महामारी मुळे प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावा म्हणून शासनाने लॉकडाउन घोषीत केला आहे, कोरोना संकटापासून बचाव व्हावा म्हणून नागरिक घरामध्येच अडकले आहेत त्याचे परिणाम घरच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहेत रोजगार धंदे बंद असल्याने रोजगारांचा प्रश्न खूपच गंभीर होत आहे, काही कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असल्याचे चित्र आहे, ज्यांचा सांभाळ होत नाही, निराधार आहेत अशा व्यक्तींचे तर खूपच हाल होताना दिसत आहे तर काही वयोवृद्ध असल्याने चालताही येत नाही त्यामुळे जेवणाची प्रचंड अडचण निर्माण होत असल्याने अशा सर्व निराधार वयोवृद्ध लोकांना मोफत घरपोच जेवण देण्याची व्यवस्था केशव वाचनालय व साहेबराव घुगे मित्र मंडळ अणदुर यांनी केली आहे. यापूर्वी दि, 19 ते 22 तारखेपर्यंत वाचनालयाच्या वतीने जनजागृती अभियान राबवून जागरण पत्रक, मास्क, डेटॉल आणि सॅनिटायझर, संदेश पर चौकाचौकात छोटे फ्लेक्स लावून जनजागृती केली होती.  


               
अजूनही कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने नागरिक लॉकडाऊन मध्ये आहेत त्यामुळे अशा लोकांची उपासमार होत असलेल्या निराधार, वयोवृद्ध व्यक्तींना घरपोच जेवण देण्याचा संकल्पना प्रत्यक्षात राबवत दिनांक 1 एप्रिल पासून घरपोच अन्न देण्याची सुरुवात केली आहे, कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या व्यक्तींना घरपोच जेवण वितरण करताना केशव वाचनालयाचे संस्थापक सचिव साहेबराव घुगे, पोलीस पाटील जावेद शेख, सोमनाथ लंगडे, विश्वनाथ लोंढे आदी उपस्थित होते
 
Top