दुधनी दि. १० : गुरुराज माशाळ

 संपूर्ण देशभर कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन घोषित केले आहेत.

लॉकडाउनच्या काळात गरीब व गरजू लोकांना मदत करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दुधनी ता. अक्कलकोट येथील रहिवाशी आडत व्यापारी भीमाशंकर काशीराय अंदेनी (अल्लापुर) परिवाराच्यावतीने कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपलं जीव धोक्यात घालून अविरत सेवा बजावत असलेल्या दुधनी नगर परिषदेतील कायमस्वरूपी आणि तात्पुरते असे एकूण ३६ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५किलो गहू, ५ किलो तांदूळ, १किलो तूर डाळ, १ किलो साखर, १पाकीट चहापुडा, १ किलो गोडतेल, १पाकीट लाल तिखट, १संतूर साबण, १ खोबरे तेलाचे बाटली, असे ९ वस्तूचा किट वाटप करण्यात आले.
  
    सध्या कोविड १९ विषाणूमुळे जनजीवन टप्प झाली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्यासाठी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहेत. दुधनी येथील भीमाशंकर अंदेनी यांनी दुधनी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली.
    
   सध्या देश संकटात आहे. अशावेळी एक नागरिक म्हणून प्रत्येकाने धावून येण्याची गरज आहे. या भावनेतून मी छोटीशी आर्थिक मदत केले आहे. अशी भावना यावेळी  भीमाशंकर अंदेनी यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी, लिपिक सुधीर सर्वगौड, करनिरीक्षक आर.आर. गुंड, लक्ष्मीपुत्र अंदेनी, शिवकुमार काळजे, दौलत हौदे,सागर अमाणे, सातलींग अंदेनी, गुरुषांत हबशी, बाबा टक्कळकी, श्रीमंत निंबाळ व पालिकेच्या सर्व स्वछता कर्मचारी उपस्थित होते.

भीमाशंकर अंदेनी परिवाराने राबविलेली उपक्रम ही एक स्तुत्य उपक्रम आहे, अशाच प्रकारे शहरातील श्रीमंत व्यक्तींनी पुढाकार घेऊन गरीब गरजू नागरिकांना मदत करावी 
- चिदानंद कोळी कार्यालयीन अधीक्षक दु.न.पा.
 
Top