दुधनी दि १० : गुरुराज माशाळ
कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. या संकटकालीन परिस्थितीत हातावर पोट असलेल्या गरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दुधनी आडत भूसार व्यापारी असोसिएशनचेवतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्य क्षेत्रातील ५५० गरीब व गरजू कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल इतका अन्न धान्याचे किट देण्यात येणार आहे.
व्यापारी असोसिएशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या किटच्या पहिल्या टप्प्यात २५० किट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या टप्यातील ३०० किट असे एकूण ५५० किट तहसीलदार अंजली मरोड मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सातलींगप्पा म्हेत्रे, तहसीलदार अंजली मरोड, सहायक निबंधक दत्ता मोरे, सचिव एस.एस. स्वामी, विजयकुमार हडलगी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी,प्रतिष्ठित आडत व्यापारी शिवानंद माड्याळ, गिरमल्लप्पा सावळगी, शिवानंद हौदे, अशोक पादी, रेवणसिद्द पाटील यांच्यासह इतर आडत व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
