काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील रहिवासी व सध्या भिवंडी येथे वकील व्यवसाय करणारे अॅड. हणमंत जाधव यांनी भिवंडीत उस्मानाबाद, लातूर,बीडसह मराठवाड्यातील कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप केले. लॉकडाऊनमुळे भिवंडीतील अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे नाका कामगार, यासह अन्य ठिकाणी काम करणारे आणि हातावर पोट असणा-या गरीबांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
भिवंडीत मराठवाड्यातील कामानिमित्त गेलेल्या अनेक गोरगरीब कुटुंबाकडे किराणा वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेच नसल्याचे चित्र दिसत असल्याने तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील रहिवासी तथा सद्या भिवंडी न्यायालयात आपला वकीली व्यवसाय सांभाळत असलेले अॅड.हणमंतराव जाधव आणि त्यांचे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संकट काळात आपल्या बांधवांना मदत करावी या हेतूने मराठवाड्यातील नागरिकांना आधार देत पंच्चेवीस कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करून त्यांना थोडासा आधार दिला.
यावेळी अॅड. हणमंत जाधव भिवंडी वैशाली जाधव,हणमंत जाधव, ऋषिकेश जाधव,सृष्टी जाधव,प्रणाली जाधव उपस्थित होते.