उस्मानाबाद, दि.17 :-  जिल्‍ह्यासाठी माहे एप्रिल 2020 साठी 6 हजार 562.75 मेट्रिक टन धान्‍य मंजूर झालेले आहे. 

त्‍यामध्‍ये अंत्‍योदय योजनेसाठी 1231.30 मेट्रिक टन (साखर-11.20 मे.टन), प्राधान्‍य कुटुंब योजनेसाठी  4187.55 मेट्रिक टन व केशरी कार्डधारक शेतकरी योजनेसाठी  1143.90  मेट्रिक टन धान्‍य मंजूर आहे. प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेसाठी एकूण 5643.20 मेट्रिक टन तांदूळ मंजूर करण्‍यात आला आहे. यामध्‍ये अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांसाठी 877.10 मेट्रिक टन व प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांसाठी 4766.10 मेट्रिक टन तांदूळ मंजूर करण्‍यात आला आहे.

          भारतीय अन्‍न महामंडळाचे गोडाऊन मधून अंत्‍योदय योजना, प्राधान्‍य कुटुंब योजना आणि शेतकरी योजनेची शंभर टक्के उचल झालेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेच्‍या धान्‍याची  75 टक्के उचल झालेली असून उर्वरीत  धान्‍याची दोन दिवसात उचल  

करण्‍यात येईल. आतापर्यंत अंत्‍योदय योजना, प्राधान्‍य कुटुंब योजना व केशरी (शेतकरी) योजने अंतर्गत 94.89 टक्के धान्‍याचे वाटप झाले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत 34.28 टक्के  तांदूळ वाटप करण्‍यात आला आहे.

              अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी 35 किलो धान्य ( 23 किलो गहु  आणि  12 किलो तांदुळ ) दोन रुपये प्रति किलो प्रमाणे गहु  आणि तांदळाचा दर 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे मिळणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी धान्य प्रतिव्यक्ती 3 किलो गहू   2  रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ 2 किलो 3 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. एपीएल शेतकरी योजना मधील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ 2 किलो 3 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना  साखर 1 किलो 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.   

तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्‍न  योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी (अंत्‍योदय व प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थी) अतिरिक्त 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत मिळणार आहे.

          रास्‍तभाव दुकानदारांमार्फत लाभार्थ्‍यांना  धान्‍य वाटप करताना दक्षता समिती, जिल्‍हा परिषदेचे शिक्षक व  इतर विभागाचे शासकीय कर्मचारी यांचे समक्ष social distancing चा वापर करुन धान्‍य वाटप करण्‍यात यावे, असे तहसिलदारांमार्फत निर्देश देण्‍यात आलेले आहेत.

जिल्‍हयातील  प्राप्‍त  तक्रारीच्‍या अनुषंगाने जिल्‍हयात खालील  पाच दुकानांचे परवाने निलंबीत करण्‍यात आलेले आहेत. ‍

मौ. आष्‍टा कासार ता. उमरगा येथील रास्‍तभाव दुकान क्र.2 ,  मौ. आष्‍टा कासार ता. उमरगा येथील रास्‍तभाव दुकान क्र. 3, मौ. मुरुम ता. उमरगा येथील चेअरमन वि.का.सो. रास्‍तभाव दुकान क्रं.2, सौ. यु.बी. भोगे रास्‍तभाव दुकानदार मौजे जळकोट ता. तुळजापूर, मौ. तिंत्रज ता. भूम येथील रास्तभाव दुकान .
 
Top