नळदुर्ग, दि. १७ :   कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक झाली होती त्याचर्चेनंतर केंद्र व राज्य शासनाने निर्णय घेऊन 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. पण जनतेच्या खाण्याची सोय व्हावी यासाठी अत्यावश्यक सेवेला सूट दिली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी खरेदी करायला गेल्यास कोरोना चा संक्रमण होऊ नये याची खबरदारी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांनी आदेश देऊन जिल्ह्यात मास्कचे वापर सक्तीचे केले आहे. आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतीने 19 मार्च रोजी पासून कोरोनाबाबत सुरू केलेल्या जनजागृती अभियाना त्याअंतर्गत कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी मास्क चे वापर केलेच पाहिजे यासाठी आरंभ व नगरपालिकाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड कार्यालयीन, सामाजिक कार्यकर्ते सुशांत भूमकर, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. 
         
 आरंभच्या वतीने सुरू असलेल्या जनजागृती अभियाना अंतर्गत नळदुर्ग, होर्टी, चिकुंद्रा, बाभळगाव, लोहगाव नंतर परत एकदा नळदुर्ग येथील भाजी मंडई येथे मोफत मास्कचे वाटप व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचे वापर करा, वारंवार हात धूत रहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता आल्यास नागरिकांना 500 रु दंड (दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई) , सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रु दंड (दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई), सोशल डिस्टन्स चे पालन न केल्यास ग्राहकांना 200 तर विक्रेत्यांना 500 रु दंड (दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई), जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास 1000 रु चा दंड वसूल करण्याच्या आदेशाबाबत ची माहिती देऊन कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी नपचे कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण कुंभार, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, विजय डुकरे, बबलू इनामदार, भीमाशंकर बताले आदि उपस्थित होते.


 
Top