उस्मानाबाद : बालाजी बाबासाहेब ढेकणे, रा. कौडगांव, ता. उस्मानाबाद याने दि. 04.04.2020 ते 07.04.2020 या कालावधी दरम्यान त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन समाजात धार्मीक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज विघातक मजकुर टाकला. तसेच मा. मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकुर (पोस्ट) प्रसिध्द केला. अशा रितीने त्याने सामाजिक एकता व सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.
यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 153 (अ) (1) (अ), 505 (2) अन्वये गुन्हा दि. 08.04.2020 रोजी नोंदवण्यात आला असुन सायबर पो.ठा. मार्फत अधिक तपास केला जात आहे.
