उमरगा, दि. 12 :

उमरगा तालुक्यातील मुरूम  (आचारी तांडा) येथिल  कांहीजण पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथील एका   साखर कारखाना कार्यक्षेञात चालु गळीत हंगामात  ऊस तोडणीच्या कामासाठी मजुर  काम करत होते. शनिवारी   सर्व  मजुर ऊसतोडणीचे काम पूर्ण करून राहत असलेल्या ठिकाणी ट्रॅक्टरनी जात असताना रात्री  दहाच्या सुमारास अचानक समोरून येणाऱ्या  ट्रकने जोरदार धडक दिली.

या भिषण आपघातात ट्रॅक्टर मधील खूबा किसन जाधव वय ४८ व त्यांचा भाचा राजू रामा राठोड  वय २८ रा. आचारी तांडा, मुरूम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर  सुरेश केशव राठोड वय ४५, अमित खुबा जाधव वय ६, राम मुन्ना राठोड वय ६६ हे गंभीर जखमी झाले. जखमीना  प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार करून पुढील उपचरारसाठी कराड येथील कराड चॅरिटेबल ट्रस्ट येथे दाखल केल्याचे नातेवाईकानी सांगितले.
 
Top