काटी : उमाजी गायकवाड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. हातावरचे पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, गरजू, कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी सरसावत असून अन्न, जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने काटी येथे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून येथील मदरसा दाऊतुल उलूम जामा मज्जीद काटी यांच्या वतीने सर्व समाजातील गरजूंना, कष्टकरी एकूण 75 कुटुंबाला एक महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, शेंगदाणे, गोडेतेल,साखर,दाळ  या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. 

शनिवार दि. (18) रोजी सायंकाळी 5 वाजता सो‌‌शल डिस्टंन्सिंगचे पालन करून पोहेकॉ. नाईकवाडी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा   कुटुंबाना किराणा साहित्याचे 20 किलो धान्याचे किट वाटप करून मुस्लिम बांधवांनी सर्व समाजातील गरजू गोरगरिबांना घरपोच किराणा साहित्याचे 20 किलोचे किट वाटप केले.

     यावेळी  नागरिकांना आवाहन करताना बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर  म्हणाले की, आज भारतासह जगातील प्रत्येक देश हा कोरोना विषाणूच्या दहशतीखाली जगत आहे. आपण सर्वांनी मिळून त्याची दहशत थांबवण्याची गरज आहे. आपण सर्वांनी खबरदारी घेऊन शासकीय यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोना हद्दपार करू असा आत्मविश्वास दिला. आणि येथील मदरसा दाऊतुल उलूम  जामा मज्जीद काटीने सामाजिक बांधिलकीतून केलेल्या किराणा साहित्याच्या वाटपाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. 

         यावेळी सरपंच आदेश कोळी, पोहेकॉ. नाईकवाडी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख, पत्रकार उमाजी गायकवाड, सुजित हंगरगेकर, अशोक जाधव,बाबुमियॉं काझी, करीम बेग, अहमद पठाण,श्रीहरी ढगे, माजीद इनामदार,अमिर पठाण,अशोक गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top