मुरूम : कोरोना (कोवीड-१९)या संसर्गरोगाच्या लढाईसाठी श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना ,मुरूम यांच्यावतीने ११ooooo(अकरा लाख) रुपये व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १,५०,००० (दीड लाख) रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शनिवार(ता.१८)रोजी देण्यात आले.
विठ्ठलसाई कारखान्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आदींच्या उपस्थितीत देण्यात आला.सतत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विठ्ठलसाई कारखाना परिवाराचे व जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या वतीने आभार व्यक्त केले. फोटो-