अणदूर, दि. १८ :

मदत करणारा कोणीही असो तो नेहमी आपल्यासाठी देवदूतच असतो. प्रत्येकाची अशीच अपेक्षा असते की आपण अडचणीत असताना कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावे. यातूनच अणदूर येथील भीमराव सुर्यवंशी व सुर्यवंशी परिवारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या गरजु लोकांना 15 दिवस पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप केले. 

लॉकडाऊनच्या काळात त्यांचे काम धंदे पूर्णपणे बंद झाले आहेत. कामधंदे बंद असल्यामुळे या गोरगरीब कुटुंबातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.परीणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.   अणदुर येथे गरजू लोकांना 15 दिवस पुरेल ईतक्या किराणा मालाचे वाटप भिमराव सुर्यवंशी व सुर्यवंशी परिवारा तर्फे वाटप करण्यात आले.
 
Top