तुळजापूर, दि २३ :

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने तुळजापूर शहरातील गोरगरीब गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे किट बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.

तुळजापूर येथे बालाघाट शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने माजी आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सिद्रमाप्पा आलुरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असणाऱ्या नागरिकांना किराणा साहित्याचे किट माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांच्या शुभहस्ते  गरजू गोरगरीब नागरिकांना  सोशल डिस्टन्स  आणि  मास्क चा उपयोग करून  वितरित करण्यात आले . याप्रसंगी  सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे,  सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा.रमेश नन्नवरे पाटील,प्रा. जी. व्ही. पाटील, डॉ.सतिष महामुनी,  डॉ. शिवाजी जेटीथोर,  अकाउंटंट पांडुरंग नागणे यांची उपस्थिती होती. सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन करीत मास्क अशी सर्व बंधने यावेळी पाळण्यात आली.

याप्रसंगी राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाच्या आणि राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या खबरदारी घेण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे यामध्ये कोणीही हलगर्जीपणा करू नये आपल्या जीवाला वाचवण्यासाठी सरकार आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे असे आवाहन केले, ग्रामीण भागात आपल्या गावामध्ये प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे ही खूप समाधानाची बाब आहे असेही या निमित्ताने माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
 
Top