नळदुर्ग, दि. २३ :

कोरोना सारख्या विषाणूने अख्ख्या जगाला विळखा घालून जेरीस आणलेला असताना भारत मात्र त्याला सक्षमपणे तोंड देऊन त्यावर मात करीत असलेला दिसतो आहे. त्यात तुमच्यासारख्या सूज्ञ समंजस नागरीकांचाही हातभार  आहे. असे उद्गार तहसिलदार सौदागर तांदळे यांनी नळदुर्ग येथील  व्यंकटेशनगर येथे धान्याच्या किटचे वाटप करताना काढले.

  सुरुवातीला तहसिलदार सौदागर तांदळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के, मंडलाधिकारी गांधले, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून औक्षण करण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आपल्यासाठी ते झटत आहे आपल्यासाठी ते रस्त्यावर उतरत आहेत म्हणून त्यांचं कौतुक व्यंकटेश नगरवासीयांच्या वतीने करण्यात आले. 

शरणाप्पा पतगे, विजयकुमार धरणे, विनय परळकर, सिद्धाप्पा मुरमे, शिवाजी माने, गोविंदराव कदम, कमलाकर गुळवे, शिवाप्पा जवळगे, मुकुंद सांगवीकर, डॉ. नागेंद्र अरबळे, शैलजा भस्मे, दयानंद जाधव, डॉ. संतोष पवार, सचिन होर्टीकर, भैरवनाथ कानडे आदींच्या सहकार्यातून लॉकडाऊन मुळे अडकलेल्या बांधकामावरील परप्रांतीय ४९ मजूर तसेच फिरस्ते असणारे वेगवेगळ्या भागातून आलेली ५० डवरी गोसावी यांना एक क्विंटल गहू ,एक क्विंटल तांदूळ, एक क्विंटल कांदे, एक क्विंटल बटाटे, 100 नग पत्ताकोबी, तेलाचा बॉक्स, मसाला, तिखट, मिठाचे पुढे, इत्यादी   वस्तूंचे किट वाटप तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने मंडलाधिकारी गांधले यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बोलताना तहसीलदार सौदागर तांदळे म्हणाले खरतर आपल्यासारख्या व्यक्ती, सेवाभावी संस्था अशी मदत कार्य करत आहेत याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपणही समाजाची बांधिलकी जपत आहात मदतीच्या रूपाने सेवेत खारीचा वाटा उचलत आहात याबद्दल प्रशासनाच्यावतीने मी आपले आभार मानतो . आपण करीत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे  असे भावोद्गार त्यांनी काढले.  यावेळी पत्रकार विलास येडगे, पत्रकार सचिन गायकवाड, नगरसेवक विनायक अहंकारी, नगरसेवक बसवराज धरणे हेही उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ संतोष पवार यांनी तर आभार भैरवनाथ कानडे यांनी मानले.
 
Top