काटी : उमाजी गायकवाड
महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहून 'डिजिटल' च्या माध्यमातून करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर करण्यासाठी केंद्र आणि ,राज्य सरकारचे आवाहन केले होते. कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन त्यांच्या विषयी आदर आणि कोरोनाविरुध्दच्या लढाईत आपली एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी आंबेडकर प्रेमी नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करून अभिवादन करण्यात आले. येथील माजी सरपंच सौ. गिता अशोक जाधव, अशोक जाधव यांच्या कुटुंबीयांच्या वतीने घरीच भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी अमित जाधव, अस्मिता जाधव, ओम जाधव, दिव्या जाधव, अमर क्षिरसागर, सौ. शिल्पा क्षिरसागर उपस्थित होते.