अणदूर, दि. १४ :

​विश्वरत्न, प्रकाड पंडित, अर्थतज्ञ, घटनापती, महानायक, उच्चविभूषित, कायदेपंडित, इतिहासतज्ञ, महामानव,  भारतीय संविधानाचे शिल्पकार,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे घरीच साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करुन  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन त्यांच्या विषयी आदर आणि कोरोनाविरुध्दच्या लढाईत आपली एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले होते.  त्या आवाहनाला प्रतिसाद देत  तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी आंबेडकर प्रेमी नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच  साजरी करून अभिवादन करण्यात आले.  येथील सामजिक कार्यकर्ते प्रतिक सुरवसे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने घरीच भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
 
Top