काटी : उमाजी गायकवाड

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य राज्यातील प्रवासी महाराष्ट्रात येऊ नयेत त्याचप्रमाणे उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन जिल्ह्यतील प्रवाशी दोन्ही जिल्ह्यांत जावू नयेत म्हणून दोन्ही जिल्ह्यच्या सीमा उस्मानाबाद पोलीसांनी तामलवाडी टोल नाका तर सोलापूर पोलिसांनी व्हणसळ फाटाजवळ बंद करण्यात आल्या आहेत.


आंतरजिल्हा सीमेवर नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून आंतरजिल्हा बंदी अंतर्गत बाहेरील प्रवाशांना प्रवेश करता येऊ नये म्हणून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवरील तामलवाडी टोल नाका व व्हणसळ फाटा या ठिकाणी कडक नाकाबंदी केली असल्याची माहिती तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर आणि सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी  आमच्या प्रतिनिधीला दिली. दोन्ही बाजूंनी नाकाबंदी केल्याने सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. हि नाकाबंदी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या तामलवाडी येथे  22 मार्च पासून सुरू करण्यात आली असून वहानांची कसून तपासणी करण्यात येत आहे.


 या दोन्ही जिल्ह्यच्या सीमा जिल्हाबंदीमध्ये उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन जिल्ह्यसह  जिल्ह्याबाहेरील प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसून अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व अन्य कर्मचा-यांना राज्य शासनाकडून पासेस दिले आहेत.ते पासेस पाहूनच  प्रवेश दिला जात आहे. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो  प्रवास करू नये, नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर आणि सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी केले आहे.
 
Top